मी PhonePe वर बँक खाते कसे जोडावे?
UPI पेमेंट करण्यासाठी आणि इतरांकडून पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमचे विद्यमान बँक खाते PhonePe वर लिंक करू शकता. असे करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे :
- तुमचा PhonePe वरील मोबाइल नंबर आणि बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल नंबर समान असायला हवा.
- तुम्ही जोडू इच्छित असलेल्या बँक खात्यासाठी तुम्ही मोबाइल बँकींग सेवा सक्रिय केलेली असायला हवी. मोबाइल बँकींग सक्रिय करण्यासाठी, तुम्ही तुमच्या बँकेकडे संपर्क करू शकता.
- सत्यापनासाठी SMS पाठविण्यासाठी या मोबाइल नंबर मध्ये पुरेसा बॅलेन्स असायला हवा. तुम्ही तुमच्या कोणत्याही संपर्कास SMS पाठवून हे तपासू शकता.
- चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल नेटवर्क उपलब्ध असायला हवे.
PhonePe वर तुमचे बँक खाते जोडण्यासाठी:
- होम पेज वरील Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत My Money/माझे पैसे > Bank Account/ बँक खाते वर क्लिक करा.
- Add New Bank Account/नवीन बँक खाते जोडा वर क्लिक करा.
- सूची मधून तुमची बँक निवडा. तुम्ही सर्च बार वर नाव टाकून सुद्धा तुमची बँक शोधू शकता.
टीप: जर तुमची बँक सूची मध्ये नसेल तर,तुम्ही PhonePe वर तुमचे बँक खाते जोडू शकणार नाहीत. तुमची बँक सूची मध्ये नसेल तर काय करावे याबाबत अधिक माहिती पाहा. - सत्यापनाच्या उद्देशासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक SMS पाठविला जाईल. विनंती केल्यावर तुम्ही SMS परवानगी दिली असल्याचे सुनिश्चित करा.
टीप: तुमच्या PhonePe खात्यासोबत नोंदणीकृत असलेला मोबाइल नंबर आणि बँक खात्यासोबत नोंदणीकृत मोबाइल नंबर समान असल्यास, UPI प्लॅटफॉर्मद्वारे तुमचे बँक खाते आपोआप आणले जाईल. - तुम्ही कोणत्याही इतर ॲपवर बँक खात्यासाठी UPI पिन सेट केला नसेल तर Set UPI PIN/ UPI पिन सेट करा वर क्लिक करा. तुमच्याकडे आधीच या खात्यासाठी UPI पिन असेल, तर तुमचे खाते आपोआप लिंंक केले जाईल.
SMS सत्यापन अयशस्वी झाले तर काय होईल आणि मी माझ्या बँकेसोबतचा मोबाइल नंबर कसा अपडेट करावा या लिंक अधिक माहितीसाठी पाहा .