मला दुसऱ्या पेमेंट ॲपवर आधीच बनवलेला UPI आयडी (VPA) वापरता येईल का?
तुम्ही दुसऱ्या पेमेंट ॲपवर UPI आयडी (VPA) बनवला असला, तरी ते VPA हँडल हे त्या पेमेंट ॲपसाठीच विशिष्ट असते. त्याचप्रकारे PhonePe वर, जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्याचा विशिष्ट VPA तयार करता तेव्हा एक हँडल (@ybl / @ibl) त्यास आपोआप जोडले जाते.
तथापि, तुम्ही दुसऱ्या ॲपवर वापरलेल्या VPA चा समान उपसर्ग वापरू शकता (जर अजूनही उपलब्ध असेल आणि PhonePe ॲपवर दुसऱ्या युजरद्वारे त्यास घेतले गेले नसेल), तुमचे हँडल PhonePe साठी विशेष असते आणि म्हणूनच PhonePe साठी तुमचा VPA सुद्धा युनिक आहे.
अधिक माहितीसाठी पाहा - मला माझे UPI (VPA) सानुकूलित करता येतील का.