मी माझा UPI पिन कसा रिसेट कसा करावा?

तुम्ही कोणत्याही बँकेसाठीचा तुमचा UPI पिन विसरल्यास, तुम्ही PhonePe ॲपवर त्यास रिसेट करू शकता. तुमचा पिन रिसेट करण्यासाठी: 

  1. होम पेज वरील My Money/माझे पैसे वर क्लिक करा आणि पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत Bank Account/ बँक खाते वर जा. 
  2. खात्यातील Reset UPI PINUPI पिन रिसेट करा वर क्लिक करा.
  3. त्या बँक खात्यासाठी तुमचे डेबिट/ATM कार्ड चे तपशील टाका. 
  4. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर वर SMS च्या माध्यमातून मिळालेला 6-अंकी OTP प्रविष्ट करा. 
    टीप: तुम्ही SMS अनुमती सक्षम केली असेल तर OTP ला PhonePe द्वारे आपोआप आणले जाईल. तुम्ही PhonePe ला OTP आपोआप घेऊन येण्यासाठी सक्षम करू शकता. यासाठी तुमच्या फोन वर Settings>> Apps & Notifications>> PhonePe >> Permissions वर जा. 
  5. तुमच्या डेबिट/ATM कार्ड साठी 4-अंकी ATM कार्ड पिन प्रविष्ट करा. 
  6. तुम्ही खात्यासाठी सेट करू इच्छित असलेला नवीन 4 किंवा 6 अंकी UPI पिन प्रविष्ट करा. 
  7. नवीन पिन पुन्हा टाकण्याद्वारे त्याची पुष्टी करा. 
  8. Confirm/पुष्टी करा वर क्लिक करा. 

 अधिक माहितीसाठी पाहा - UPI पिन रिसेट केल्यानंतर लगेच माझ्या व्यवहारावरील मर्यादा काय आहेत