माझा UPI पिन सेट / रिसेट केल्यानंतर लगेच लागू होणाऱ्या व्यवहारांवरील मर्यादा काय आहेत?
तुम्ही तुमचा नवीन पिन सेट केल्यानंतर किंवा जुना UPI पिन रिसेट केल्यानंतर, तुमची बँक सुरक्षेची खात्री करण्यासाठी तुमच्या खात्यावर एक कूलींग-ऑफ कालावधी सेट करते. हा कालावधी प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळा असतो.
या कूलींग-ऑफ कालावधीच्या दरम्यान, तुमची बँक कमी करेल :
- प्रत्येक UPI व्यवहारासाठी तुम्ही पाठवू शकत असलेली रक्कम आणि एका दिवसात तुम्ही पाठवू शकत असलेली रक्कम
- तुम्ही प्रति तास/ प्रति दिवस करू शकणाऱ्या UPI व्यवहारांची संख्या
कूलींग-ऑफ कालावधी नंतर,
- तुम्ही एका दिवसाला पाठवू शकत असलेली प्रति UPI व्यवहार मर्यादा ₹1,00,000 वर परत येईल (काही बँकांची मर्यादा कमी असू शकते).
- तुम्ही एका दिवसात करू शकत असलेल्या UPI व्यवहारांची संख्या 10 वर परत येईल.
महत्त्वाचे: या कालावधी दरम्यानच्या मर्यादा आणि कूलींग-ऑफ कालावधी सुद्धा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
PhonePe वर तुमचा UPI पिन रिसेट करणे याबाबत अधिक माहितीसाठी पाहा - मी माझा UPI पिन कसा रिसेट करू शकेन?.