UPI पिन काय आहे?
UPI पिन हा एक युनिक 4 किंवा 6 अंकी कोड/पासवर्ड आहे. कोणत्याही ॲपवर UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी प्रत्येक बँक खात्यासाठी तुम्हाला यांस सेट करण्याची गरज असते. UPI च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व पेमेंटसाठी तुम्हाला तुमचा UPI पिन PhonePe ॲपवर टाकणे करणे आवश्यक असते.
टीप:
- तुमच्या PhonePe खात्यासोबत तुम्ही जोडलेल्या प्रत्येक बँक खात्यासाठी, तुम्ही आधीच एक बनवला नसेल, तर तुम्हाला UPI पिन सेट करण्यास सांगितले जाईल.
- एका बँक खात्यासाठी तुमच्याकडे फक्त एक UPI पिन असू शकतो. तुम्ही कोणत्याही ॲपवर बँक खात्याच्या माध्यमातून UPI पेमेंट करण्यासाठी या पिनचा वापर करू शकता.
- तुम्ही आधीच इतर कोणत्या ॲपवर बँक खात्यासाठी UPI पिन सेट केला असेल तर तुम्ही त्या बँक खात्यातून UPI व्यवहार करण्यासाठी तोच समान UPI पिन PhonPe वर वापरू शकता.
- तुम्ही UPI पिन विसरलात तर तुम्ही त्यास बदलू किंवा रिसेट करू शकता.
महत्त्वाचे: कृपया तुमचा UPI पिन कोणालाही सांगू किंवा शेअर करू नका. PhonePe किंवा बँक तुम्हाला कधीही तुमच्या UPI पिन बाबत विचारणार नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - मी माझा UPI पिन कसा बदलू शकेन किंवा - मी माझा UPI पिन कसा रिसेट करावा.