मला माझे कार्ड तपशील आणि OTP शेअर करण्यास सांगितले गेले

तुमची बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), ई-कॉमर्स वेबसाइट किंवा लॉटरी कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून तुमचा कार्ड नंबर, कार्ड एक्सपायरी डेट आणि CVV यांसारख्या तुमच्या कार्ड तपशीलांची विनंती करणारा कॉल तुम्हाला एखाद्याकडून येऊ शकतो. ते या तपशीलांचा वापर OTP जनरेट करण्यासाठी करतील आणि तुम्हाला ते त्यांच्यासोबत शेयर करण्याची विनंती करतील. एकदा तुम्ही OTP शेअर केल्यानंतर, ते पेमेंट करण्यासाठी तुमच्या कार्ड खात्यात प्रवेश करू शकतील.

कृपया तुम्ही तुमचा कार्ड नंबर, CVV, OTP, UPI पिन, MPIN किंवा इतर कोणतेही बँक तपशील यासारखी गोपनीय माहिती कोणाशीही शेयर करत नाही याची खात्री करा. PhonePe अशी संवेदनशील माहिती विचारण्यासाठी तुम्हाला कधीही कॉल करणार नाही.

तुम्हाला असे कोणतेही कॉल, मेसेज किंवा पेमेंट विनंत्या आल्यास किंवा यापैकी काही फसवणूक करणारे असल्याचा तुम्हाला संशय आल्यास, कृपया खालील बटणावर टॅप करून आम्हाला ताबडतोब त्याचा रिपोर्ट करा.