IPO साठी मला ऑटो-पे कसा सेट करता येईल?
तुम्ही PhonePe वर IPO साठी पुढीलप्रकारे ऑटो-पे सेट करू शकता:
- ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर जा.
- शेअर्ससाठी बिडिंग करताना, तुमचे पेमेंट माध्यम म्हणून UPI ला प्राधान्य द्या.
- हे पेमेंट करण्यासाठी तुम्ही ज्या बँक खात्याचा वापर करू इच्छिता त्या बँक खात्यासोबत संबंधित UPI आयडी (VPA) टाका, आणि पुढे जा.
- तुम्हाला एक पेमेंट विनंती तुमच्या PhonePe ॲपवर प्राप्त होईल. पेमेंट विनंतीचे तपशील सत्यापित करा आणि पॉप-अप मधील Accept/ स्वीकार करा वर टॅप करा.
- पॉप-अप मधील Continue/ पुढे चालू ठेवा वर टॅप करा ज्यात तुम्हाला ‘₹ ‘X’ तुमच्या खात्यात ब्लॉक केले जातील असा मेसेज दिसेल.
- तुमचा UPI पिन टाका.
अधिकृतता यशस्वी झाल्यास, तुमची बँक या पेमेंटसाठी तुमच्या खात्यातील रक्कम ब्लॉक करेल. तुमच्या खात्यातून रक्कम वजा होत नाही तोपर्यंत तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये डेबिट एंट्री म्हणून ब्लॉक केलेली रक्कम दाखवली जाणार नाही.
टीप: तुम्ही IPO साठी सेट केलेल्या ऑटो-पे बाबत अधिक तपशीलांसाठी तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागाअंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - IPO साठी बिड केल्यावर तुम्हाला युनिट्स वाटप केले गेल्यास काय होते किंवा तुम्हाला युनिट्सचे वाटप न केले गेल्यास काय होते.