माझे ऑटो-पे सेट करणे अयशस्वी झाले तर मी काय करावे?

तुमचे ऑटो-पे सेट करणे अयशस्वी होण्याची विविध कारणे असू शकतात. तुम्ही काही वेळानंतर संबंधित ॲप किंवा वेबसाइटवरून एक नवीन सेट करण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला ऑटो-पे सेट करणे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी PhonePe वर विनंती पुन्हा अधिकृत करण्याची गरज असेल.

कृपया पुन्हा प्रयत्न करण्याआधी तुमची बँक तुमच्या बँक खात्यावर UPI आणि eNACH चा वापर करून ऑटो पेमेंटला सपोर्ट करते का ते तपासा. 

तुम्हाला ऑटो-पे सेट करण्यात समस्या येणे चालूच असेल, तर कृपया संबंधित ऑटो-पे विनंतीसाठी आमच्याकडे एक तिकीट दाखल करा. हे करण्यासाठी, 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटवर टॅप करा.
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभाग अंतर्गत AutoPay/ऑटो-पे वर टॅप करा.
  3. संबंधित ऑटो-पे विनंती निवडा.
  4. Contact Customer Support/ग्राहक साहाय्यतेशी संपर्क साधा वर टॅप करा.