मी PhonePe वर पेमेंट रिमाइंडर कसा सेट करावा?

तुम्ही PhonePe वर पुढील प्रकारे पेमेंट रिमाइंडर सेट करू शकता:

1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
2. Settings & Preferences/सेटिंग्स आणि प्राधान्यक्रम अंतर्गत Reminders/रिमाइंडर वर टॅप करा.
3. रिमाइंडर जोडा/Add Reminder वर क्लिक करा.
4. प्राप्तकर्ता जोडा/Add Recipient वर क्लिक करा.
5. एक संपर्क निवडा, UPI आयडी टाका किंवा बँक खाते निवडा.
6. रक्कम टाका.
7. वारंवारिता निवडा (दैनिक, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक).
8. प्रारंभ दिनांक निवडा आणि आवश्यक असल्यास, एक संदेश जोडा.
9. जतन करा/Save वर क्लिक करा.

तुम्ही पेमेंट रिमाइंडर सेट केल्यानंतर, तुम्ही सेट केलेल्या रिमाइंडर तारखेला आम्ही तुम्हाला पेमेंटसाठी अधिसूचित करू.