मला नवीन UPI आयडी सक्रिय करण्याची का आवश्यकता आहे?

पेमेंट अयशस्वी होणे किंवा विलंब होणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक बँक खात्यासाठी आम्ही तुम्हाला एकापेक्षा जास्त UPI आयडी हँडल्स (@ybl, @ibl, @axl) सक्रिय करण्याची शिफारस करतो.

जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त UPI आयडी सक्रिय करता, तेव्हा एका हँडलसोबत संबंधित PSP बँकेवर नेटवर्क समस्या असेल तर PhonePe तुमचे पेमेंट पर्यायी हँडलच्या माध्यमातून मार्गस्थ करू शकतो. अशाप्रकारे, तुमचे पेमेंट फेल न होता जलद केले जाईल हे PhonePe ला सुनिश्चित करता येते. म्हणून संबंधित बँक खात्याच्या त्या वेळेच्या कार्यप्रदर्शनाच्या आधारावर PhonePe ला कोणत्याही एका सक्रिय UPI ID हँडल च्या माध्यमातून तुमचे पेमेंट पूर्ण करता येईल.   

टीप: पैसे पाठवताना, तुम्हाला ज्या बँक खात्यातून पेमेंट करायचे आहे फक्त ते बँक खाते निवडा, तुमचा UPI आयडी नाही. PhonePe आपोआप कोणत्याही एका सक्रिय UPI ID हँडलच्या माध्यमातून पेमेंट पूर्ण करेल. 

अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - नवीन UPI आयडी हँडल्स सक्रिय करताना SMS सत्यापन अयशस्वी झाल्यास काय करावे