माझा UPI पिन हा माझ्या ATM पिन किंवा MPIN पेक्षा कसा वेगळा आहे?
ATM पिन हा 4-अंकी कोड आहे जो सामान्यतः बँकेद्वारे प्रदान केला जातो, आणि त्याचा वापर डेबिट कार्ड पेमेंट प्रमाणित करण्यासाठी केला जातो आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी केला जातो.
MPIN हा एक पासकोड आहे ज्याचा वापर IMPS आणि NEFT सारखे मोबाइल बँकिंग पेमेंट प्रमाणित करण्यासाठी आणि नॅशनल युनिफाईड USSD प्लॅटफॉर्मवर केला जातो.
UPI पिन हा एक 4 किंवा 6-अंकी पासवर्ड आहे ज्याचा वापर तुम्ही कोणत्याही पेमेंट ॲपवर UPI पेमेंट करण्यासाठी करू शकता. जर तुम्ही आधी UPI पिन सेट केला नसेल तर तुम्ही PhonePe वर जोडणाऱ्या कोणत्याही बँक खात्यासाठी एक युनिक UPI पिन सेट करणे गरजेचे असेल.
महत्त्वाचे: कृपया तुमचा UPI पिन कोणालाही सांगू किंवा शेअर करू नका. PhonePe किंवा बँक तुम्हाला कधीही तुमच्या UPI पिन बाबत विचारणार नाही.