मी PhonePe वर बँक खाते कसे जोडावे?
तुम्ही UPI पेमेंट करण्यासाठी आणि इतरांकडून पैसे प्राप्त करण्यासाठी तुमचे विद्यमान बँक खाते PhonePe वर लिंक करू शकता. असे करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे :
- तुमचा PhonePe वरील मोबाइल नंबर आणि बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल नंबर समान असायला हवा.
- तुम्ही जोडू इच्छित असलेल्या बँक खात्यासाठी तुम्ही मोबाइल बँकींग सेवा सक्रिय केलेली असायला हवी. मोबाइल बँकींग सक्रिय करण्यासाठी, तुम्ही तुमच्या बँकेकडे संपर्क करू शकता.
- सत्यापनासाठी SMS पाठविण्यासाठी या मोबाइल नंबरमध्ये पुरेसा बॅलेन्स असायला हवा. तुम्ही यासाठी तुमच्या कोणत्याही संपर्कास SMS पाठवून तो यशस्वीपणे त्यांना पोचला का हे तपासू शकता.
- तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल नेटवर्क उपलब्ध आहे.
PhonePe वर बँक खाते जोडण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर क्लिक करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा आणि Add New Bank Account/नवीन बँक खाते जोडा वर टॅप करा.
- सूची मधून तुमची बँक निवडा. तुम्ही सर्च बारवर नाव टाकून सुद्धा तुमची बँक शोधू शकता.
टीप: जर तुमची बँक सूचीमध्ये नसेल तर तुम्ही तुमचे बँक खाते PhonePe वर जोडू शकणार नाही. अधिक माहितीसाठी पाहा - तुमची बँक PhonePe वर सूचिबद्ध नसेल तर काय करावे. - सत्यापनाच्या उद्देशासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून एक SMS पाठविला जाईल. विनंती केल्यावर तुम्ही SMS परवानगी दिली असल्याचे सुनिश्चित करा.
टीप: तुमच्या PhonePe खात्यासोबत नोंदणीकृत असलेला समान मोबाइल नंबर बँक खात्यासोबत नोंदणीकृत असल्यास, UPI प्लॅटफॉर्मद्वारे ते आपोआप आणले जाईल. - तुम्ही कोणत्याही इतर ॲपवर बँक खात्यासाठी UPI पिन सेट केला नसेल तर Set UPI PIN/UPI पिन सेट करा वर क्लिक करा. जर तुमच्याकडे आधीच या खात्यासाठी UPI पिन असेल, तर तुमचे खाते आपोाप लिंक केले जाईल.
अधिक माहितीसाठी पाहा -. SMS सत्यापन अयशस्वी झाले तर तुम्ही काय कराल आणि तुम्ही तुमचा बँकेसोबतचा मोबाइल नंबर कसा अपडेट करू शकता.