मी PhonePe वर माझ्या बँक खात्याचा बॅलेन्स पाहण्यास असमर्थ का होत आहे?
जर तुम्ही PhonePe वर तुमचे बँक बॅलेन्स तपासण्यास असमर्थ असाल, तर ते खालीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे असू शकते:
- तुमच्या बँकेतील तांत्रिक समस्या
- खराब इंटरनेट किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी
- तुम्ही एकदा किंवा अनेक वेळा चुकीचा UPI पिन टाकला आहे
- तुम्ही त्या खात्यासाठी UPI पिन सेट केलेला नाही
तुम्ही पुढील उपाय करू शकता,
- तांत्रिक समस्यांमुळे तुम्ही तुमची शिल्लक तपासू शकत नसल्यास 1 तासानंतर प्रयत्न करा
- तुमचा मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली आहे का ते तपासून पहा
- योग्य UPI पिन वापरून पाहा किंवा तुमचा UPI पिन रीसेट करा आणि पुन्हा प्रयत्न करा
- तुमच्या खात्यासाठी UPI पिन सेट केल्यानंतर प्रयत्न करा
- तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि PhonePe वर तुमचा मोबाइल नंबर आणि तुमच्या बँक खात्यासोबत नोंदणीकृत मोबाइल नंबर एकच आहे का ते तपासा.
- अनलिंक केल्यानंतर आणि PhonePe वर तुमचे बँक खाते जोडल्यानंतर प्रयत्न करा
टीप: तुम्ही फक्त PhonePe वर जोडलेल्या बँक खात्यांचा बॅलेन्स तपासू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचे बँक खाते जोडणे.