मी UPI आयडी (VPA) वर पैसे कसे पाठवावे?

PhonePe वरून एखाद्या व्यक्तीच्या UPI आयडी वर पैसे पाठवण्यासाठी: 

  1. ॲप होम स्क्रीनच्या Transfer Money/ट्रान्सफर मनी विभागाखाली Bank/UPI ID/बँक/UPI आयडी वर टॅप करा. 
  2. सर्च बारमध्ये प्राप्तकर्त्याचा UPI आयडी टाका. 
  3. तुमच्या संपर्काचा UPI आयडी निवडा किंवा आयडी टाकल्यावर सत्यापित करा वर क्लिक करा. 
  4. रक्कम टाका. 
  5. Send/पाठवा वर क्लिक करा. 

तुम्ही पाठवलेले पैसे प्राप्तकर्त्याच्या UPI आयडी सोबत लिंक बँक खात्यात जमा केले जातील.

महत्त्वाचे: पैसे पाठवताना, तुम्हाला ज्या बँक खात्यातून पेमेंट करायचे आहे फक्त ते बँक खाते निवडा, तुमचा UPI आयडी नाही. 

टीप: कधीकधी, अंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे, असे होऊ शकते की तुम्ही टाकलेला UPI आयडी, तो बरोबर असला तरी सत्यापित होत नाही. अशा मामल्यात, काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. 

अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा -  एखाद्या व्यक्तीने तुमच्या कोणत्याही एका UPI आयडी वर पैसे पाठवल्यास तुम्हाला ते पैसे कुठे प्राप्त होतील.