मला माझे UPI आयडी वापरून काय करता येईल?
तुम्ही तुमचा PhonePe UPI आयडी पुढीलप्रकारे वापरू शकता:
- तुमच्या संपर्कास हा UPI आयडी शेअर करुन पैसे प्राप्त करणे.
- तुमच्या UPI आयडी वर तुमच्या संपर्कांपैकी कोणी पेमेंट विनंती पाठवल्यास त्यांना पैसे पाठवणे.
- UPI पेमेंट पर्याय निवडून मर्चंट पेमेंट करणे. तुमचा PhonePe UPI आयडी टाका, आणि तुम्हाला SMS द्वारे पेमेंट विनंती प्राप्त होईल, त्यानंतर PhonePe ॲपवरुन तुम्ही पेमेंट करू शकता.
तुमच्या कोणत्याही संपर्कांचे UPI आयडी वापरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- तुमच्या संपर्कांना त्यांच्या मोबाइल नंबर ऐवजी त्यांच्या UPI आयडी च्या माध्यमातून पैसे पाठवणे. तुम्ही PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वरून Transfer Money/ ट्रान्सफर मनी विभागात जाऊन हे करू शकता.
टीप: UPI च्या माध्यमातून कोणतेही पेमेंट करताना, तुम्हाला ज्या बँक खात्यातून पेमेंट करायचे आहे फक्त ते बँक खाते निवडा, तुमचा UPI आयडी नाही.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही UPI आयडी वर पैसे कसे पाठवू शकता.