मी माझा UPI पिन कसा सेट किंवा रिसेट करू?

तुम्ही तुमचे डेबिट कार्ड किंवा तुमचा आधार नंबर वापरून तुमचा UPI पिन सेट किंवा रिसेट करू शकता. 

तुमचे डेबिट कार्ड वापरून

तुम्ही तुमचे डेबिट कार्ड वापरू इच्छित असल्यास,

1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
2. <style type="text/css"><!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा आणि तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI पिन रिसेट किंवा बदलायचा आहे ते बँक खाते निवडा.
3. खाली दाखवल्याप्रमाणे UPI पिनच्या बाजूला दिलेल्या Reset/Set वर टॅप करा,

4. त्या खात्यासाठी तुमचे डेबिट/ATM कार्ड तपशील टाका.
5. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर SMS च्या माध्यमातून प्राप्त झालेला 6-अंकी OTP टाका.
टीप: तुम्ही SMS परवानगी सक्षम केली असल्यास, PhonePe द्वारे OTP आपोआप टाकला जाईल. तुम्ही तुमच्या फोनच्या Settings >>Apps & Notifications >> PhonePe >> Permissions वर जाऊन PhonePe आपोआप टाकला जाणे सक्षम करू शकता.
6. तुमच्या डेबिट/ATM कार्डसाठी 4-अंकी ATM पिन टाका.
7. नवीन 4 किंवा 6-अंकी UPI पिन टाका.  
8. पुष्टी करण्यासाठी UPI पिन पुन्हा टाका.
9.Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

हे सुद्धा पाहा:

मला OTP का प्राप्त नाही होत आहे?
माझ्याकडे डेबिट किंवा ATM कार्ड नसेल तर काय? 
मी माझा ATM पिन विसरल्यास काय होईल?

तुमचे आधार कार्ड वापरून

तुम्ही तुमचा आधार नंबर वापरू इच्छित असल्यास, 

1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
2.  <style type="text/css"><!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> Bank Accounts/बँक खाती वर टॅप करा आणि तुमचे बँक खाते निवडा.
3. त्या खात्याच्या अंतर्गत UPI पिनच्या बाजूला दिलेल्या Set or Reset/सेट किंवा रिसेट करा वर टॅप करा. 
4. बँक पर्यायासोबत लिंक असलेला आधार नंबर निवडा आणि Proceed/पुढे जा वर टॅप करा.
5. तुमच्या आधार नंबरचे पहिले 6 अंक टाका.
टीप: तुम्हाला दोन OTP प्राप्त होतील, एक तुमच्या बँकेकडून आणि दुसरा UIDAI कडून.
6. दोन्ही OTP टाका.
7. नवीन 4 किंवा 6-अंकी UPI पिन टाका.
8. पुष्टी करण्यासाठी UPI पिन पुन्हा टाका.
9. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

हे सुुद्धा पाहा:

मी दोन वेळा चुकीचा आधार नंबर टाकला तर काय होईल?
माझा आधार लिंक नंबर आणि PhonePe रजिस्टर्ड नंबर वेगवेगळे असल्यास मी काय करावे?
मला माझा UPI पिन सेट करण्यासाठी आधार पर्याय का नाही दिसत आहे?
मला OTP का प्राप्त होत नाही आहे?