UPI नंबर काय आहे?

UPI नंबर हा एक विशेष 8, 9, किंवा 10 अंकी नंबर आहे ज्याचा वापर कोणत्याही पेमेंट ॲपवर UPI पेमेंट प्राप्त करण्यासाठी पेमेंट करण्याचा पत्ता म्हणून केला जाऊ शकतो. तुम्ही पेमेंट ॲप्सवर रजिस्टर करताना जो मोबाइल नंबर वापरता तोच नंबर तुमचा 10-अंकी UPI नंबर होईल.

तुमचा PhonePe वर रजिस्टर्ड मोबाइल नंबर हा तुमचा UPI नंबर असेल, आणि NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या डेटाबेसमध्ये UPI आयडी (VPA) सोबत लिंक केला जाईल. इतर पेमेंट ॲप्सवरून हा UPI नंबर वापरुन तुम्हाला पैसे पाठवल्यास, तुमचा नंबर डेटाबेसमध्ये जोडला जात असताना तुम्ही जे बँक खाते प्राथमिक बँक खाते म्हणून लिंक केले होते त्या खात्यात ते पैसे जमा होतील.

NPCI डेटाबेस आणि तुमचा मोबाइल नंबर NPCI च्या डेटाबेसवर का जोडला गेला याबाबत अधिक जाणून घ्या.