कार्ड टोकनायझेशन काय आहे?

कार्ड टोकनायझेशन ही एक प्रक्रिया जी तुम्हाला तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कोणत्याही प्लॅटफॉर्मवर सुरक्षित करण्यासाठी मदत करते. जेव्हा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड टोकनाइझ करता, तेव्हा तुमचा कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, आणि CVV केवळ तुमच्या कार्ड जारीकर्त्याद्वारे सुरक्षितपणे संग्रहित केले जातात जेणेकरून तुम्ही एक सुरक्षित पेमेंटचा अनुभव सुनिश्चित करता. 

RBI च्या 30/09/2022 पासून लागू झालेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय कार्ड पेमेंट करण्याचा आनंद घेण्यासाठी कार्डधारकांनी त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे टोकनायझेशन करण्याची शिफारस केली गेली आहे.

तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे टोकनायझेनश करून घेण्याचे लाभ याबाबत अधिक जाणून घ्या.