मी PhonePe वर माझे डेबिट / क्रेडिट कार्ड कसे सेव्ह करावे?
तुम्ही जलद पेमेंटचा अनुभव घेण्यासाठी PhonePe वर डेबिट / क्रेडिट कार्ड सेव्ह करू शकता.
टीप: आम्ही आमच्या ॲपवर Visa, Mastercard, Maestro आणि Rupay द्वारे जारी केलेल्या सर्व देशांतर्गत डेबिट/क्रेडिट कार्डला सपोर्ट करतो.
कार्ड सेव्ह करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत Debit & Credit Cards/डेबिट व क्रेडिट कार्ड वर टॅप करा.
- Add New Card/नवीन कार्ड जोडा वर टॅप करा आणि तुमचे कार्डचे तपशील टाका
- तुमचा कार्ड नंबर, तुमच्या कार्डची वैधता, आणि CVV नंबर टाका.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर तुम्हाला प्राप्त झालेला OTP टाका.
टीप: तुम्हाला प्राप्त होणारा OTP आपोआप भरला जाण्यासाठी तुम्ही PhonePe ला SMS परवानगी सक्षम करून अनुमती देऊ शकता. तुम्ही हे फोनच्या Settings >> Apps & Notifications >> PhonePe >> Permissions वर जाऊन करू शकता. - Confirm/ पुष्टी करा वर क्लिक करा.
महत्वाचे: तुम्ही ॲपवर सेव्ह करणाऱ्या प्रत्येक कार्ड साठी PhonePe प्रमाणीकरणाच्या उद्देशाने ₹2 किंवा ₹5 शुल्क वजा करेल. ही रक्कम आपोआप तुमच्या खात्यात परत जमा केली जाईल.