मी वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करू?

तुम्ही PhonePe ॲपवर आधीच सेव्ह कलेल्या पात्र Visa डेबिट/क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करण्यासाठी: 

  1. PhonePe अ‍ॅपच्या होमस्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती सेक्शन अंतर्गत View All Payment Methods/सर्व पेमेंट पद्धती पाहा वर टॅप करा.
  3. डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्स निवडा.
  4. सेव्ह केलेल्या कार्डच्या अंतर्गत Activate/ सक्रिय करा वर क्लिक करा. हा पर्याय केवळ पात्र डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी उपलब्ध राहील. तथापि, फारच क्वचितवेळा तुम्हाला तुमच्या कार्ड जारीकर्त्या बँकेकडून पाठवलेला OTP टाकण्यास सांगितले जाऊ शकते. 
    टीप: वर्तमानात, तुम्ही फक्त काही विशिष्ट Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करू शकता, आणि तुम्ही या फीचरचा वापर करून ₹2,000 पर्यंतचे पेमेंट करू शकता.
  5. तुम्ही ज्या कार्डसाठी हे फीचर सुरू करत आहात त्या कार्डचा CVV नंबर टाका
    टीप: प्रमाणीकरणासाठी तुमच्या कार्डमधून ₹2 वजा केले जातील. ही रक्कम तुमच्या खात्यात परत केली जाईल.
  6. तुमचे कार्ड जारीकर्त्या बॅंकेसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका.
  7. Confirm/ पुष्टी करा वर क्लिक करा.