वन-क्लिक पेमेंट काय आहे?

वन-क्लिक पेमेंट चे फीचर तुम्हाला PhonePe ॲपवर फक्त एक टॅप करून पेमेंट करण्याची सुविधा देते. वन-क्लिक पेमेंट ॲक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही तुमचा डेबिट/क्रेडिट कार्डचा CVV नंबर किंवा तुमच्या कार्ड जारीकर्त्या बॅंकेने पाठवलेला OTP इ. तपशील न टाकता ॲप वर पेमेंट करू शकता.

महत्त्वाचे: सध्या, तुम्ही फक्त काही Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट सक्रिय करू शकता, आणि या फीचरचा वापर करून तुम्ही ₹2,000 पर्यंतचे पेमेंट करू शकता.     

तुम्ही PhonePe वर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड सेव्ह करता, तेव्हा तुम्हाला पात्र Visa डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी वन-क्लिक पेमेंट पर्याय उपलब्ध असल्याचे दिसेल. तुम्ही ॲपवर My Money/माझे पैसे विभागात Visa डेबिट आणि क्रेडिट कार्ड आधीच जोडली असतील तर त्यांच्यासाठी देखील हे फीचर सुरु करू शकता.

अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर वन-क्लिक पेमेंट कसे सक्रिय करू शकता.