FASTags हे प्रिपेड, रिचार्ज करता येणारे टॅग आहेत ज्याचा वापर तुम्ही टोलबुथवर आपोआप पेमेंट करण्यासाठी करू शकता. FASTag लावल्यास तुम्ही सर्व टोलबुथवरून न थांबता जाऊ शकता. FASTags ला सामान्यतः तुमच्या वाहनाच्या समोरच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते. तुमचे वाहन टोलबुथवरून जात असताना टोलशुल्क तुमच्या FASTag सोबत लिंक केलेल्या बँक खात्यातून किंवा प्रिपेड वॉलेटमधून वजा केले जाते.