मी PhonePe वर FASTag कसे खरेदी करू?
तुम्हाला PhonePe वर सहजपणे FASTags ची खरेदी करता यावी म्हणून आम्ही ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे.
FASTags खरेदी करण्यासाठी:
- Recharge and Pay Bills/रिचार्ज आणि पे बिल विभागाखाली See All /सर्व पाहा वर टॅप करा.
- Purchases/खरेदी विभागात Buy FASTag/FASTag खरेदी करा टॅप करा.
- तुमचा PAN, वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका आणि Continue/सुरू ठेवा वर टॅप करा.
- पुढील पृष्ठावर, तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक, कंपनी आणि मॉडल याचे तपशील टाका आणि Continue/पुढे चालू ठेवा वर टॅप करा
- तुमच्या वाहनाची अद्याप सरकारी नोंदणी झाली नसेल, तर तुम्हाला प्रमाणीकरणासाठी तुमच्या वाहनाची मुळ RC प्रत अपलोड करणे गरजेचे असेल.
- तुमचे नाव, मोबाइल नंबर, आणि इतर आवश्यक तपशील टाका, आणि Continue/पुढे चालू ठेवा वर टॅप करा.
- तुमचा वितरणाचा पत्ता टाका आणि Continue/पुढे चालू ठेवा वर टॅप करा.
- तुमच्या FASTag तपशीलांचे पुनरावलोकन करा, ICICI बँकेच्या नियम व अटी स्वीकारा, आणि Proceed to Pay वर टॅप करा.
- तुमचे पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट करा.
टीप:अखंडित रिचार्ज अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या रिचार्जसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे.
तुम्ही यशस्वीपणे ऑर्डर केल्यावर, तुमचे FASTag चे वितरण तुम्हाला 7 दिवसांच्या आत केले जाईल. तुम्ही Air Waybill (AWB) नंबर, ज्यास SMS च्या माध्यमातून शेअर केले जाईल, वापरून तुमच्या FASTag च्या डिलिव्हरीचा माग घेऊ शकता.
तुम्हाला तुमच्या FASTag ची खरेदी किंवा वितरण यात कोणतीही समस्या येत असेल, तर तुम्ही ICICI बॅकेच्या सहाय्यता टीमशी त्यांच्या टोल फ्री क्रमांक 1800 2100 104 वर संपर्क करू शकता. तुम्ही त्यांना 1860 2670 104 वर सुद्धा कॉल करू शकता (या नंबरवर कॉल करण्यासाठी तुमच्याकडून पैसे आकारले जातील).
टीप: तुम्ही सध्या PhonePe वर फक्त प्रवासी कार वाहनांसाठी FASTag खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या FASTag खरेदीवर कोणती लागू शुल्क आहेत.
संबंधित प्रश्न
FASTag साठी कोणते शुल्क आहेत?
FASTag काय आहे?
सुविधा शुल्क