PhonePe वर UPI पेमेंट करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमचे बँक खाते जोडले पाहिजे.
PhonePe वर तुमचे बँक खाते जोडताना पुढील गोष्टींची खात्री करा:
- तुम्ही PhonePe वर नोंदणी करण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल क्रमांक आहे.
- तुम्ही जोडू इच्छित असलेल्या बँक खात्यासाठी तुम्ही मोबाइल बँकिंग सेवा सक्रिय केल्या आहेत. मोबाइल बँकिंग सक्रिय करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेची ग्राहक सेवा कडे संपर्क करू शकता.
- मोबाइल नंबरमध्ये सत्यापनाकरिता SMS पाठवण्यासाठी पुरेसा बॅलेन्स असावा. तुम्ही हे तुमच्या संपर्कातील एखाद्या क्रमांकावर SMS पाठवून तो यशस्वीरित्या पोचतो आहे की नाही हे पाहून तपासू शकता.
- तुमच्याकडे उत्तम इंटरनेट कनेक्शन आणि मोबाइल नेटवर्क आहे.
एकदा तुम्ही वरील सर्व तपासल्यावर,
- PhonePe ॲपच्या
होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर क्लिक करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागात Add New Bank Account /नवीन बँक खाते जोडा वर टॅप करा आणि सूचीमधून तुमची बँक निवडा. तुम्ही तुमची बँक शोधू आणि निवडू शकता.
- सत्यापनाच्या उद्देशाने, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून एक SMS पाठवला जाईल. विनंती केल्यावर तुम्ही SMS साठी परवानगी दिल्याचे सुनिश्चित करा.
टीपः तुमचे बँक खाते UPI प्लॅटफॉर्मद्वारे आपोआप प्राप्त केले जाईल.