QR कोड वापरणे

तुम्ही QR कोड वापरून पैसे कसे पाठवू आणि प्राप्त करू शकता हे समजून घेण्यासाठी येथे काही सोप्या पायऱ्या दिल्या आहेत:

पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे

तुम्ही अनेक दुकानांमध्ये पेमेंटसाठी QR कोड ठेवलेला पाहिला असेल. तुम्ही या दुकानांमध्ये QR कोड स्कॅन करुन त्वरित पेमेंट करू शकता. यासाठी, 

  1. स्कॅनर उघडण्यासाठी PhonePe अ‍ॅप वरील होम स्क्रीनवर QR code/ QR कोड आयकॉनवर टॅप करा.             
  2. कोड स्कॅन करण्यासाठी तुमचा फोन कॅमेरा QR कोड वर धरा. 
  3. तुम्ही पेमेंट करू इच्छित असलेली रक्कम टाका आणि Send/ पाठवा वर टॅप करा. 
  4.  तुमचा गोपनीय UPI PIN टाका आणि Submit/ सबमिट करा वर टॅप करा..
पेमेंट प्राप्त करण्यासाठी तुमचा QR कोड वापरणे

 

तुम्ही तुमच्या खात्यात पैसे प्राप्त करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक QR कोड वापरू शकता. तुमचा QR कोड शोधण्यासाठी, 

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. 
  2. Payment Settings/पेमेंट सेटिंग्ज विभागा अंतर्गत QR Codes/QR कोड टॅप करा.

ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत अशा व्यक्तीला तुमचा वैयक्तिक QR कोड स्कॅन करण्यास परवानगी देऊन तुम्ही PhonePe वर तुमच्या प्राथमिक लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे प्राप्त करू शकता.  

 

 

हे सुद्धा पाहा: