माझ्या अयशस्वी झालेल्या पेमेंट्ससाठी माझे पैसे का वजा केले गेलेत?
जर अयशस्वी झालेल्या पेमेंटसाठी तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा झाले असतील, तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमचे पैसे तुमच्या बँकेकडे पूर्णपणे सुरक्षित आहेत. पैसे तुमच्या खात्यात तुम्ही पेमेंट केल्यावर 1 दिवसात परत केले जातील. रिफंडच्या पुष्टीकरणासाठी तुम्ही संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट एक दिवसानंतर तपासू शकता.
तुमची बँक पेमेंट दिनांकापासून 5 दिवसांत पैसे परत करण्यास अयशस्वी झाल्याच्या दुर्मिळ घटनेत, कृपया त्यांच्याशी या पेमेंटसाठी युनिक ट्रान्झॅक्शन रेफरंस (UTR) नंबर देऊन संपर्क साधा. ते तुम्हाला यात मदत करतील.
टीप: काही त्रुटीच्या परिस्थितीत, तुमची बँक तुमचे वजा झालेले पैसे ताबडतोब परत करू शकते. पण तुम्हाला तुमच्या बँकेकडून अशा रिफंडबाबत SMS प्राप्त होण्यासाठी विलंब होऊ शकत असल्यामुळे,आम्ही तुम्हाला पुष्टी करणासाठी संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्याची शिफारस करतो.
अधिक माहितीसाठी पाहा - बँकांकडून रिफंडमध्ये विलंब.