मी एखाद्या ऑर्डर किंवा बुकिंगसाठी दोनदा पेमेंट केले तर काय करावे?
तुम्ही एखाद्या ऑर्डर किंवा बुकिंगसाठी दोनदा पेमेंट केल्याच्या दुर्दैवी घटनेत, आम्ही तुम्हाला शिफारस करतो की तुम्ही थेट मर्चंटशी संपर्क साधावा आणि त्यांना या डबल पेमेंटबाबत सूचित करावे. मर्चंट त्यांच्या पेमेंट रेकॉर्ड तपासल्यानंतर तुम्ही पेमेंट केलेली अतिरिक्त रक्कम तुम्हाला परत करायला हवी.
मर्चंटने रक्कम परत देण्यास नकार दिल्याच्या दुर्मिळ घटनेत, कृपया थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि संबंधित पेमेंटसाठीचा युनिक ट्रांन्झॅक्शन रेफरंस (UTR) नंबर देऊन तक्रार दाखल करा. तुमची बँक याबाबत तुमची अधिक चांगल्याप्रकारे मदत करू शकेल.
टीप: भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी, आम्ही तुम्हाला पुन्हा पेमेंट करण्यापूर्वी तुमच्या अंतिम पेमेंटची स्थिती तपासण्याची शिफारस करतो.