माझे UPI पेमेंट प्रलंबित असेल तर मी काय करावे?
तुमचे UPI पेमेंट प्रलंबित असेल, तर तुम्ही अशावेळी पेमेंटची अंतिम स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पेमेंट केल्याच्या वेळेपासून 48 तासांपर्यंत प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.
48 तासांनंतर, बँक तुमच्या प्रलंबित पेमेंटची स्थिती एकतर यशस्वी किंवा अयशस्वी म्हणून अपडेट करेल. तुमचे पेमेंट यशस्वी झाल्याचे सुस्पष्ट केल्यावर, पेमेंट रक्कम प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा केली जाईल. तुमचे पेमेट अयशस्वी झाल्याचे स्पष्ट केल्यास, पेमेंट दिनांकापासून 3 ते 5 दिवसांच्या आत पेमेंटची रक्कम तुमच्या खात्यात परत केली जाईल.
तुमच्या बँकेने अपडेट केल्यावर लागलीच आम्ही तुमच्या प्रलंबित पेमेंटच्या स्थितीबाबत तुम्हाला सूचित करू. पर्यायाने, तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History /व्यवहार इतिहास विभागावर टॅप करून स्थिती तपासू शकता.
महत्त्वाचे: तुमचे पैसे बँकेकडे अगदी सुरक्षित आहेत, आणि पेमेंटच्या अंतिम स्थितीच्या आधारावर एकतर प्राप्तकर्त्याच्या खात्यात जातील किंवा तुमच्या खात्यात परत येतील.
अधिक माहितीसाठी पाहा - पेमेंटच्या अंतिम स्थितीसाठी तुम्ही 48 तास का प्रतीक्षा करायला हवी.