मी चुकीच्या बँक खात्यावर पैसे पाठवले तर काय करावे?
तुम्ही चुकीच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याच्या दुर्दैवी घटनेत, तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधावा आणि पेमेंटचा युनिक ट्रांन्झॅक्शन रेफंरस (UTR) नंबर देऊन चुकीच्या क्रेडिट चार्जबॅक दाखल करावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.
तुम्ही ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले त्यांचे बँक खाते तुमच्या बँकेत असेल, तर तुमची बँक तुमच्या वतीने थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकेल आणि पैसे तुम्हाला परत देण्याची विनंती करु शकेल.
तुम्ही ज्या व्यक्तीस चुकून पैसे पाठवले त्यांचे बँक खाते दुसऱ्या बँकेत असेल, तर तुमची बँक केवळ फॅसिलेटर म्हणून कार्य करू शकते, आणि तुम्हाला बँकेच्या ब्रँचचे काही तपशील देऊ शकते. तुम्हाला ब्रँचला भेट देऊन पुढील सहाय्यतेसाठी ब्रँच मॅनेजरशी बोलावे लागेल.
टीप: प्राप्तकर्ता सहमत असेल तरच पैसे परत केले जाऊ शकतात. त्यांनी तसे केल्यास, पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील