माझे पेमेंट यशस्वी झाले पण पैसे प्राप्तकर्त्यास मिळाले नाही तर काय?

PhonePe वर पेमेंट तेव्हाच यशस्वी म्हणून दर्शवले जाते जेव्हा आम्हाला प्राप्तकर्त्याच्या बँकेकडून त्यांना पैसे प्राप्त झाल्याचे पुष्टीकरण मिळते. बँका UPI पेमेंट्ससाठी प्राप्तकर्त्याच्या खात्यात त्वरित पैसे जमा करतात. पैसे जमा झाल्याचे कन्फर्म करण्यासाठी कृपया प्राप्तकर्त्यास संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्यास सांगा.

टीप: तुम्ही योग्य खात्यावर पैसे पाठवले असल्याची खात्री करण्यासाठी कृपया PhonePe ॲपच्या History/व्यवहार इतिहास विभागात पेमेंटचे तपशील तपासा. याशिवाय तुम्ही,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील To Account/खात्यावर टॅप करा.
  2. संबंधित बँक खात्याच्या शेजारील 3 ठिपक्यांवर टॅप करा. 
  3. सूचीबद्ध पर्यायांमधून Edit /संपादित करा पर्याय निवडा. 
  4. बँकेचे नाव, खाते नंबर आणि खाते धारकाचे नाव दर्शवले जाईल.