पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहेत हे प्राप्तकर्त्यास कसे कळेल?

जर तुम्ही PhonePe वर रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा PhonePe UPI आयडीचा वापर करून पैसे पाठवले असतील, तर पैसे प्राप्तकर्त्याने पेमेंटच्यावेळी PhonePe वर त्याचे प्राथमिक बँक खाते म्हणून सेट केलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. प्राप्तकर्ता पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहेत हे पाहाण्यासाठी त्यांच्या PhonePe ॲपच्या History /व्यवहार इतिहास विभागात पेमेंटचे तपशील पाहू शकतात.

तुम्ही गैर-PhonePe UPI आयडीवर पैसे पाठवले असल्यास, कृपया प्राप्तकर्त्यास बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्यास सांगा जे UPI आयडीसोबत लिंक आहे.