मी चुकीचा फोन नंबर किंवा UPI आयडी (VPA) ला पैसे पाठवल्यास काय होईल?
तुम्ही चुकीच्या फोन नंबर किंवा UPI आयडी (VPA) वर पैसे पाठवल्याच्या दुर्दैवी घटनेत, तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधावा आणि युनिक ट्रांन्झॅक्शन रेफंरस (UTR) नंबर देऊन चुकीच्या क्रेडिट चार्जबॅकसाठी तक्रार अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो.
तुम्ही ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले त्यांचे बँक खाते तुमच्या बँकेत असेल, तर तुमची बँक तुमच्या वतीने थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकेल आणि त्यांना तुम्हाला पैसे परत करण्याची विनंती करु शकते.
तुम्ही ज्या व्यक्तीला चुकून पैसे पाठवले त्यांचे बँक खाते दुसऱ्या बँकेत असेल, तर तुमची बँक केवळ फॅसिलेटर म्हणून कार्य करू शकते, आणि तुम्हाला ब्रँचचे काही तपशील देऊ शकते. तुम्हाला ब्रँचला भेट देऊन पुढील सहाय्यतेसाठी ब्रँच मॅनेजरशी बोलावे लागेल.
टीप: प्राप्तकर्ता सहमत असेल तरच पैसे परत केले जाऊ शकतात. त्यांनी तसे केल्यास, पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील