पेमेंट यशस्वी झाले पण प्राप्तकर्त्यास पैसे मिळाले नाही तर काय?

PhonePe वर पेमेंट तेव्हाच यशस्वी म्हणून दर्शवले जाते जेव्हा आम्हाला प्राप्तकर्त्याच्या बँकेकडून त्यांना पैसे प्राप्त झाल्याचे पुष्टीकरण मिळते. बँका UPI पेमेंट्ससाठी प्राप्तकर्त्याच्या खात्यात त्वरित पैसे जमा करतात. कृपया कन्फर्मेशनसाठी प्राप्तकर्त्यास संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट तपासण्यास सांगा. 

टीप: जर तुम्ही एका PhonePe युजर किंवा PhonePe UPI आयडीवर पैसे पाठवले असतील, तर पैसे प्राप्तकर्त्याने पेमेंटच्यावेळी PhonePe वर त्याचे प्राथमिक बँक खाते म्हणून सेट केलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. प्राप्तकर्ता पैसे कोणत्या खात्यात जमा झाले आहेत हे पाहाण्यासाठी त्यांच्या PhonePe ॲपच्या History /व्यवहार इतिहास विभागात पेमेंटचे तपशील पाहू शकतात.