दावा दाखल करण्यासाठी कोणते दस्तऐवज लागतात?
तुमचे नॉमिनी किंवा कायदेशीर वारस यांना क्लेम करण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे:
दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाल्यास:
- क्लेम फॉर्म
- MLC (मेडिको कायदेशीर प्रकरणे) किंवा FIR (प्रथम माहिती अहवाल)
- महापालिकेतर्फे सादर करण्यात आलेले मृत्यूचे प्रमाणपत्र आणि मृत्यूचे कारण
- शवविच्छेदन अहवाल
- शरीरातील आतील भाग, रासायनिक विश्लेषण किंवा फॉरेन्सिक अहवाल
- पोलिसांची अंतिम चार्ज शीट किंवा कोर्टाचे अंतिम आदेश
- घटनास्थळी केलेला पंचनामा
- रुग्णालयाने तयार केलेली कागदपत्रे
दुर्दैवाने पूर्ण अपंगत्व आल्यास:
- क्लेम फॉर्म
- MLC मेडिको कायदेशीर प्रकरणे) किंवा FIR (प्रथम माहिती अहवाल)
- पोलिसांची अंतिम चार्ज शीट किंवा कोर्टाचे अंतिम आदेश
- घटनास्थळी केलेला पंचनामा
- जिल्हा रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालय यांनी सादर केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- रुग्णालयाने तयार केलेली कागदपत्रे
- वैद्यकीय प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही तुमच्या दाव्याचा माग कसे घेऊ शकता.