मला माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी खरेदी करता येईल का?
होय, आपण स्वतःसाठी आणि कुटुंबातील खालील सदस्यांसाठी पॉलिसी खरेदी करू शकता :
- कायदेशीर विवाहित जोडीदार
- आई-वडिल आणि सासू-सासरे
महत्त्वाचे: आपण समान पॉलिसीअंतर्गत आपले आई-वडिल आणि सासू-सासरे यांना कव्हर करू शकता. - अवलंबित मुले (म्हणजेच नैसर्गिक किंवा कायदेशीररित्या दत्तक घेतली गेलेली) 3 महिने ते 25 वर्षे वयोगटातील.
टीपः जर मूल 18 वर्षापेक्षा जास्त असेल आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल तर आपण पॉलिसीचे नूतनीकरण करता तेव्हा त्याचे किंवा तिचे संरक्षण कव्हर होणार नाही.
ग्रुप आरोग्य संजीवनी पॉलिसी खरेदी करणे याबाबत अधिक जाणा.