मी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय उपचार घेतल्यास मला दावा दाखल करता येईल का?

होय, तुम्ही कोणत्याही रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले तरी आपण दावा दाखल करू शकता. तथापि, आपण विमा प्रदात्याचे नेटवर्क हॉस्पिटल निवडले किंवा नाही याच्या आधारावर दाव्याची प्रक्रिया बदलू शकते.

हे कसे वेगळे आहे याबाबत पुढे दिले आहे:

● तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल निवडल्यास कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकता.
● जर तुम्ही विमा प्रदात्याच्या नेटवर्कचा भाग नसलेले एखादे रुग्णालय निवडले असल्यास आपल्याला खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी बिले आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

कॅशलेस सुविधा आणि दाव्याची प्रतिपूर्ती यात काय फरक आहे याबाबत अधिक जाणा.