कार विमा पॉलिसी तुमच्या कारचे नैसर्गिक आपत्ती, रस्त्यावरील अपघात, वाहनाचे नुकसान यासारख्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण करते. तुम्ही तीन प्रकारच्या कार विम्यामधून निवड करू शकता,
सर्वसमावेशक(कांप्रहेन्सिव्ह) विमा प्लॅन: याची शिफारस केली जाते. हा प्लॅन तुमच्या कार आणि थर्ड पार्टीच्या कोणत्याही नुकसानापासून तुम्हाला विस्तृत विमा कव्हरेज देतो.
थर्ड पार्टी प्लॅन: हा विमा घेणे कायद्याने अनिवार्य आहे. थर्ड पार्टीला आणि त्यांच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानाला हा केवळ दायित्व प्लॅन कव्हर करतो.
स्टँडअलोन ओन डॅमेज प्लॅन (स्वतःच्या नुकसानासाठी स्वतंत्र प्लॅन) - तुम्ही आधीच एक दीर्घकालावधीची थर्ड पार्टी पॉलिसी घेतली असेल तर या प्लॅनची शिफारस केली जाते. तुमच्या कारचे झालेले कोणतेही नुकसान हा विमा कव्हर करतो.
महत्त्वाचे: PhonePe ही पॉलिसी खरेदी करताना तुमच्याकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारणार नाही. विमा प्रदात्याने नमूद केल्यानुसार तुम्हाला फक्त प्रीमियमची रक्कम भरावी लागेल.