इन्श्युअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) काय आहे?

इन्श्युअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (IDV) म्हणजे उतरविलेल्या विम्याचे घोषित मूल्य असून ही विमा कंपनीने निश्चित केलेली कमाल विम्याची रक्कम आहे जी विमा उतरवलेल्या वाहनाची चोरी झाल्यास किंवा एकूण नुकसान म्हणून प्रदान केली जाऊ शकते. हे तुमच्या कारचे सध्याचे बाजार मूल्य आहे. चोरी झाल्यास किंवा वाहनाचे संपूर्ण नुकसान झाल्यास, IDV ही भरपाई आहे जी विमा कंपनी पॉलिसीधारकाला प्रदान करेल.