माझा विमा एक्सपायर(कालबाह्य) झाल्यानंतर मी त्याचे नूतनीकरण कसे करू? 

महत्त्वाचे: तुमच्या कारसाठी नेहमी सक्रिय विमा पॉलिसी कव्हर असणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे.

तुमची कार विमा पॉलिसी कालबाह्य झाल्यास, तुम्ही PhonePe वर एक नवीन पॉलिसी खरेदी करू शकता. तथापि,तुम्हाला सर्वसमावेशक(कांप्रहेन्सिव्ह) विमा पॉलिसी घ्यायची असल्यास, विमा प्रदात्याने पॉलिसी जारी करण्यापूर्वी तुम्हाला कागदपत्रे आणि तुमच्या कारचे फोटो इन्सपेक्शनसाठी सादर करावे लागतील. अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या कारचे इन्सपेक्शन करून घेणे.

याशिवाय, तुमची सर्वसमावेशक(कांप्रहेन्सिव्ह) विमा पॉलिसी कालबाह्य होऊन 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला असल्यास, तुम्ही जमा झालेला नो-क्लेम बोनस (NCB) गमवाल.

टीप: तुम्ही थर्ड-पार्टी इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला तुमच्या कारचे इन्सपेक्शन करण्याची गरज नाही.

अधिक माहितीसाठी पाहा - नो-क्लेम बोनस (NCB).