मी माझ्या कारचे इन्स्पेक्शन कसे करून घेऊ?
कार इन्स्पेक्शनची (तपासणी) आवश्यकता असल्यास, विमा प्रदाता विम्याच्या कोटेशन तपशीलांसह याचा उल्लेख करेल.
अशा परिस्थितीत, पेमेंट पुष्टीकरण स्क्रीनवर Add Photos/फोटो जोडा टॅप करून पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कारचे फोटो सबमिट करावे लागतील. तुम्ही पेमेंट पूर्ण केल्यापासून 48 तासांच्या आत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
महत्त्वाचे मुद्दे:
- तुम्ही Add Photos/फोटो जोडा वर टॅप केल्यावर आणि प्रक्रिया सुरू केल्यावर, तुम्हाला 10 मिनिटांच्या आत सर्व आवश्यक फोटो काढून करून सादर करावे लागतील. तुम्ही हे या वेळ मर्यादेच्या आत करू शकला नाहीत, तर तुम्हाला प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल.
- सर्व आवश्यक फोटो यशस्वीरीत्या सादर करण्यासाठी, तुमचे लोकेशन, कॅमेरा आणि गॅलरीवर प्रवेशासाठी विनंती केल्यावर, तुम्ही ती प्रदान केल्याची खात्री करा.
- प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे स्थिर इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा
- तुमचे कार नोंदणी प्रमाणपत्र (RC) जवळ हाती लागेल असे ठेवा
- तुमची कार इतर कारपासून दूर पार्क करा जेणेकरून तुम्ही वाइड-एंगल फोटो घेऊ शकाल आणि तुमच्या कारच्या कडा कॅप्चर करू शकाल
- फोटोचा आकार कमाल 5 MB पर्यंत मर्यादित करा
- सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि सबमिट करण्यापूर्वी फोटोंचे पुनरावलोकन करा
अधिक माहितीसाठी पाहा - इन्सपेक्शनसाठी तुम्हाला काय सबमिट करावे लागेल आणि तुम्ही फोटो सादर करू शकला नाहीत तर तुम्ही काय करू शकता.