मी इन्सपेक्शनसाठी फोटो सादर केल्यानंतर पॉलिसी कधी जारी केली जाईल?
एकदा तुम्ही आवश्यक फोटो सादर केल्यानंतर, विमा प्रदाता त्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी 24 तासापर्यंतचा वेळ घेतील. सादर केलेल्या फोटोंच्या आधारे, विमा प्रदाता पॉलिसी जारी करणे स्वीकारू किंवा नाकारू शकतात.
त्यांनी स्वीकारल्यास, तुमची पॉलिसी ताबडतोब जारी केली जाईल आणि तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर सॉफ्ट कॉपी पाठवली जाईल. पॉलिसी, जारी केल्याच्या तारखेपासून सुरू होईल आणि 1 वर्षासाठी वैध राहील.
पॉलिसी नाकारली गेल्यास, त्याबाबतचे स्टेटस तुमच्या PhonePe ॲपवर Policy Details/पॉलिसी तपशील स्क्रीनवर दिसेल. आणि पेमेंट केलेली संपूर्ण रक्कम तुम्हाला परत केली जाईल.
टीप: विमा प्रदात्याने तुमची पॉलिसी जारी करण्यास नकार दिल्यास, तुम्ही PhonePe वरील इतर विमा प्रदात्यांकडून कोटेशनसाठी तपासू शकता.