पॉलिसी तपशील आणि इन्व्हॉइस

तुम्ही PhonePe वर यशस्वीपणे विमा खरेदी केल्यानंतर, तुमची विमा पॉलिसी तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवली जाईल. तुम्ही तुमच्या पॉलिसीचे तपशील तुमच्या PhonePe ॲपवर कार विमा होम स्क्रीनवर My policies/माझ्या पॉलिसी मध्ये सुद्धा पाहू शकता.

तुम्ही याचा वापर इनव्हॉइस म्हणून सुद्धा करू शकता कारण यात विम्याची प्रिमियम रक्कम दर्शविली असते.

पॉलिसी नंबर काय आहे?

पॉलिसी नंबर एक विशेष नंबर असतो जो तुमच्या पॉलिसीकरता तयार केला जातो. तुम्ही या नंबरचा वापर पुढील गोष्टींसाठी करू शकता, 

  • तुमच्या पॉलिसीत कोणतेही बदल करण्यासाठी 
  • दावा दाखल करताना 
  • प्रश्न उपस्थित करताना

अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या पॉलिसीत बदल करणे आणि दावा दाखल करणे.

मला माझ्या पॉलिसीची कागदी प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे का?

नाही, तुम्हाला तुमच्या पॉलिसीची भौतिक प्रत, छापील प्रत सोबत ठेवण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे पॉलिसीचे दस्तऐवज म्हणून PhonePe ॲपवर उपलब्ध पॉलिसीचे तपशील वापरू शकता.

तथापि, तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची एक प्रत हवी असल्यास, PhonePe ॲपवर तुमच्या विम्याच्या पॉलिसी तपशीलात दिलेल्या ई-मेल आयकॉनवर टॅप करा. तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर तुम्हाला दस्तऐवज पाठवला जाईल.

महत्त्वाचे: काहीवेळा, विमा प्रदात्याद्वारे तुमची पॉलिसी जारी केली जाण्याआधी तुम्हाला तुमच्या कारचे फोटो त्यांना सादर करावे लागू शकतात आणि त्यांना तपासून घ्यावे लागू शकते. इन्स्पेक्शन (तपासणी) बाबत अधिक जाणून घ्या.