कॅशलेस दाव्याची प्रक्रिया काय आहे?
कॅशलेस दावा ही अशी प्रक्रिया आहे जिथे तुम्ही विमा प्रदात्याच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असाल तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरण्याची गरज पडत नाही. तथापि, तुमचा विमा प्रदाता किंवा त्याच्या अधिकृत थर्ड पार्टी अॅडमिनिस्टरद्वारे (TPA) तुमचा उपचार पूर्व-अधिकृत केला जाणे आवश्यक आहे.
कॅशलेस दाव्यांसाठी प्रक्रिया कशी कार्य करते ते पुढे दिले आहे:
- तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल आणि TPA कडे उपलब्ध असलेला कॅशलेस विनंती फॉर्म डाउनलोड करावा लागेल, तो भरा आणि अधिकृततेसाठी यांपैकी एकाकडे पाठवा.
- तुमचा कॅशलेस विनंती फॉर्म आणि तुमच्याकडून किंवा नेटवर्क हॉस्पिटलकडून संबंधित वैद्यकीय माहितीची पडताळणी केल्यानंतर, विमा प्रदाता किंवा TPA संबंधित नेटवर्क हॉस्पिटलला पूर्व-अधिकृतता पत्र जारी करेल.
टीप: जर तुम्ही किंवा हॉस्पिटल संबंधित वैद्यकीय तपशील प्रदान करण्यात अक्षम असाल तर विमा प्रदाता किंवा TPA पूर्व-अधिकृतता पत्र जारी करणार नाही. - डिस्चार्जच्या वेळी, विमाधारकास डिस्चार्ज कागदपत्रांची पडताळणी करुन सही करावी लागेल आणि वैद्यकीय नसलेल्या आणि अग्राह्य खर्चासाठी पैसे द्यावे लागतील.
महत्त्वाचे: जर तुम्हाला कॅशलेस दाव्यांसाठी मंजुरी न मिळाल्यास आपण रुग्णालयाच्या डिस्चार्जनंतर विमा प्रदात्यास किंवा TPA कडे प्रतिपूर्तीसाठी दाव्याची कागदपत्रे सादर करू शकता.
.