या विम्याच्या अंतर्गत कोणते लाभ समाविष्ट आहेत?
या विम्याच्या अंतर्गत समाविष्ट असलेले लाभ पुढीलप्रमाणे आहेत. विमा संरक्षणाबाबत अधिक माहितीसाठी, कृपया पॉलिसीच्या नियम व अटींचा संदर्भ घ्या..
विमा संरक्षण | तपशील |
वैयक्तिक अपघात संरक्षण | ही पॉलिसी आपल्या प्रवासादरम्यान आपल्या कोणत्याही अपघाती दुखापतीसाठी, परिणामी मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व किंवा कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वाच्या मामल्यात विमा संरक्षण देईल. |
ट्रिप कॅन्सलेशन | पॉलिसी कोणत्याही आकस्मिक कारणांमुळे जसे एखादा आजार, नैसर्गिक आपत्ती जसे पूर, दहशतवादी हल्ला, चोरीमुळे पासपोर्ट नष्ट होणे आणि भारत सरकारचे निर्देश इ., कारणांमुळे तुमचा प्रवास रद्द झाला असेल तर तुम्हाला विमा संरक्षण देईल. |
कनेक्टींग फ्लाइट चुकणे | आधीच्या फ्लाइटचे आगमन उशीरा झाल्यामुळे तुमची कनेक्टिंग फ्लाइट किंवा इतर प्रवास चुकल्यास तुमच्या प्रवासाच्या शुल्कास विमा कव्हर दिले जाईल. |
घरात चोरीचा विमा | तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या घरात चोरी किंवा घरफोडीचा प्रयत्न झाल्यास पॉलिसी तुम्हाला विमा कव्हर देते. |
चेक-इन बॅगेज चे हरवणे | सामान्य वाहक किंवा सार्वजनिक वाहकाच्या ताब्यात असताना तुमचे चेक-इन केलेले सामान हरवल्यास, तुम्हाला निर्दिष्ट केल्यानुसार विमा रक्कम दिली जाईल. |
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा - या विम्याच्या अंतर्गत कशाचा समावेश होत नाही?.