आंतरराष्ट्रीय प्रवास विमा कोरोना व्हायरससाठी विमा संरक्षण देतो का?
होय, आंतरराष्ट्रीय प्रवास विमा पॉलिसी तुम्हाला कोरोना व्हायरससाठी विमा संरक्षण देते, हे विमा संरक्षण पुढील नियम व अटींअंतर्गत लागू होईल:
- तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करताना तुमची कोरोनाव्हायरसची चाचणी सकारात्मक आल्यासच तुम्हाला विमा संरक्षण मिळेल.
- तुमचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होण्यापूर्वी तुमची कोविड चाचणी नकारात्मक आली पाहिजे. कोविड -19 निगेटिव्ह रिपोर्ट (प्रवासापूर्वी 72 तासाच्या आधी केलेला असावा) असणे अनिवार्य आहे आणि दावा दाखल करताना आवश्यक असेल. उपरोक्त कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध नसल्यास कोविड विमा संरक्षणाचा प्रतीक्षा कालावधी गंतव्यस्थानावर (भारताबाहेर) उतरण्याच्या तारखेपासून 7 दिवस असेल. हा 7 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी लागू होणार नाही जर तुम्ही आधीच परदेशी असाल आणि पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी तुम्ही त्याचे नुतनीकरणे केले आहे.
- विमा संरक्षण केवळ तेव्हाच मिळेल जर विमाधाक कोविड-19 पॉझेटिव्ह असेल.
- जर आपण पॉलिसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केले असेल आणि ब्रेक-इन कालावधी असेल तर तुम्हाला कोरोनव्हायरससाठी पैसे भरण्याच्या तारखेपासून 7 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
टीपः ब्रेक-इन कालावधी म्हणजे नूतनीकरणाची अंतिम तारीख आणि आपण ज्या दिवशी पॉलिसीचे नूतनीकरण केले त्या तारखेदरम्यानचा कालावधी. - आपल्या आंतरराष्ट्रीय सहलीच्या आधी आपण कोरोनाव्हायरसची लक्षणे अनुभवल्यास किंवा सहल सुरु झाल्याच्या 14 दिवसांच्या आत कोविड 19 पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आला असल्यास आपण दावा दाखल करू शकत नाही.