व्यापारीकडून आलेल्या पेमेंट विनंतीवर मी कसे पेमेंट करावे?

काही स्टोर्स वर, तुमच्या खरेदीसाठी तुम्हाला एक पेमेंटची विनंती पाठविली जाऊ शकते. तुम्ही पेमेंट विनंतीवर पुढीलप्रमाणे पेमेंट करू शकता: 

  1. तुम्हाला SMS च्या माध्यमातून आलेल्या पेमेंट विनंतीवर क्लिक करा किंवा PhonePe ॲपमध्ये पेमेंटसाठी आलेल्या पॉप-अप मध्ये Pay/पेमेंट करा वर क्लिक करा.                                                                                                                                                                    टीप: तुम्हाला पेमेंट विनंती प्राप्त होते तेव्हा, पेमेंट विनंतीचे तपशील तपासा आणि तुम्ही विनंतीकर्त्यास जाणता केवळ तेव्हाच पेमेंटसाठी पुढे जा. तुम्हाला विनंतीकर्ता कोण हे माहिती नसेल, तर पॉप-अप मधील Decline/नकार द्या वर क्लिक करा. 
  2. तुमचे पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा. 
  3. तुम्ही निवडलेल्या पेमेंट माध्यमाच्या अनुसार तुमचे UPI पिन किंवा कर्ड तपशील टाका. 
  4. Submit/सबमिट करा वर क्लिक करा. 

महत्त्वाचे: तुम्हाला व्यापारी स्टोर वर पेमेंट विनंती प्राप्त होते तेव्हा, तुम्ही 3 मिनिटांच्या आत पेमेंट करण्याची खात्री करा. पेमेंट विनंती 3 मिनिटानंतर कालबाह्य होईल, आणि व्यापारीला नवीन विनंती करावी लागेल. 

तुम्हाला पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नाही तर तुम्ही काय करू शकता याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा - पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नाही तर काय करावे?