मी QR कोड वापरून पेमेंट कसे करावे?

तुम्ही पुढील प्रकारे तुमच्या PhonePe ॲपद्वारे QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता: 

1. ॲपच्या होम स्क्रीनच्या शीर्षभागी उजवीकडे असलेल्या QR कोड आयकॉन वर क्लिक करा. 
2. Scan & Pay/स्कॅन करा व पेमेंट करा  स्क्रीनमध्ये, तुम्ही जो QR कोड स्कॅन करू इच्छिता त्यावर तुमच्या फोनचा कॅमेरा केंद्रीत करा.
3. ॲप ने QR कोड स्कॅन केल्यावर आणि वाचल्यावर, तुम्हाला पेमेंट पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. तुम्ही पेमेंट करू इच्छित असलेली रक्कम टाका. 
    टीप: तुम्ही डायनॅमिक QR कोड स्कॅन केला असेल तर रक्कम आपोआप आणली जाईल.
4. तुमचे पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा. 
5. Pay/पेमेंट करा वर क्लिक करा. 
6.  जर तुम्ही हे पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असाल तर तुमचा UPI पिन टाका. 
टीप: तुम्ही ज्या दुकानात पेमेंट करण्यासाठी PhonePe QR स्कॅन कराल तेव्हा तुम्ही ज्या दुकानात पेमेंट करता आहात त्या व्यापाऱ्याने निवडलेल्या पेमेंट पर्यायाच्या आधारावर तुम्हाला पेमेंटसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याचा पर्याय सुद्धा दिसू शकतो.  

तुम्ही QR कोड स्कॅन करण्यास असमर्थ का होऊ शकता याबाबत अधिक माहिती पुढे पाहा -  तुम्ही QR कोड स्कॅन करण्यास असमर्थ का होऊ शकता.