मी QR कोड स्कॅन करू शकत नसेल तर काय? 

 तुम्ही PhonePe ॲपचे लेटेस्ट वर्शन वापरत असल्याची, तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असल्याची, आणि तुमचा फोन कॅमेरा दुसऱ्या कोणत्याही ॲपद्वारे वापरला जात नसल्याची खात्री करा आणि नंतर QR कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही अजूनही स्कॅन करू शकत नसल्यास, पुढीलप्रमाणे समस्येचे निवारण करा:

अँड्रॉइड युजर्ससाठी
  1. तुमच्या फोनचे सेटिंग उघडा.
  2. Apps & notifications वर टॅप करा आणि Google Play Services वर टॅप करा.
  3. Storage & cache वर टॅप करा आणि Clear cache करा.
  4. Clear storage वर टॅप करा आणि Clear all data वर टॅप करा.
  5. OK वर टॅप करा.
iPhone युजर्ससाठी

तुम्ही लेटेस्ट iOS आवृत्ती वापरत आहात आणि तुम्ही PhonePe ला तुमचा कॅमेरा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी दिली असल्याची खात्री करा. कॅमेरा प्रवेश देण्यासाठी,

  1. तुमच्या iPhone वर सेटिंग उघडा.
  2. PhonePe साठी शोध घ्या.
  3. Camera च्या बाजूच्या बटणावर टॅप करा.

एकदा पूर्ण झाल्यावर, कृपया QR कोड पुन्हा स्कॅन करण्याचा प्रयत्न करा. हे मदत करत नसल्यास, PhonePe अ‍ॅप बंद करा, तुमचा फोन रीस्टार्ट करा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा.

तुम्हाला अजूनही ही समस्या येत राहिल्यास, तुम्ही स्कॅन करण्याचा प्रयत्न करत असलेल्या QR कोडचा फोटो आम्हाला पाठवण्यासाठी खालील बटणावर टॅप करा.