मी PhonePe वर एक ग्रुप कसा तयार करू?

PhonePe वर ग्रुप तयार करण्यासाठी:  

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत To Mobile Number/मोबाइल नंबर वर टॅप करा. 
  2. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या + आयकॉनवर टॅप करा.
  3. Create New Group/नवीन ग्रुप तयार करा वर टॅप करा आणि तुमच्या संपर्क सूचीमधून तुम्हाला ग्रुपमध्ये जोडायचे असलेले लोक निवडा. 
    टीप: तुम्ही गैर-PhonePe युजर्सला ग्रुपमध्ये जोडू शकता. तथापि, ग्रुप पाहण्यासाठी किंवा त्यात प्रवेश करण्यासाठी त्यांना ॲप इन्स्टॉल करावे लागेल. 
  4. Continue/सुरू ठेवा वर टॅप करा. 
  5. ग्रुपचे नाव टाका, ग्रुप फोटो जोडा आणि Create/तयार करा वर टॅप करा

महत्त्वाचे: तुम्ही तयार केलेला ग्रुप पाहण्यासाठी किंवा त्यात प्रवेश करण्यासाठी सर्व ग्रुप सदस्यांनी PhonePe ॲपची लेटेस्ट आवृत्ती वापरली पाहिजे.

अधिक माहितीसाठी पाहा - ग्रुपमध्ये पैसे कसे पाठवायचे.