मी बँक खात्यात पैसे कसे पाठवू?
बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी:
- PhonePe अॅपच्या होम
स्क्रीन वर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा अंतर्गत बँक/UPI आयडी या बटनावर टॅप करा.
- + आयकॉनवर टॅप करा.
- खाते क्रमांक, IFSC, खातेधारकाचे नाव, फोन नंबर(पर्यायी) आणि टोपणनाव (पर्यायी) इत्यादी टाका.
- Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
- तुम्ही पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि Send/ पाठवा वर टॅप करा.
- हे पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन प्रविष्ट करा.
टीप: विशिष्ट बँक खात्यावर टॅप करून आणि नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यातील History/व्यवहार इतिहास पाहा यावर टॅप करून तुम्ही विशिष्ट बँक खात्यात केलेले तुमचे पेमेंट्स पाहू शकता.
महत्त्वाचे: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही NRE/NRO खात्यातून फक्त भारतीय बँक खात्यांवर आणि NRE/NRO खात्यांवर पैसे ट्रान्सफर करू शकता.